अभिनेता/अभिनेत्री
१] ऐकतो मराठी, बोलतो मराठी , वाचतो मराठी…. मायबोली
कृतीत मराठी , ऊक्तीत मराठी , अस्मितेत मराठी ….. मायबोली ,
भावनेत मराठी, कल्पनेत मराठी ,प्रेरणेत मराठी ….. मायबोली
जोडते मराठी , घडविते मराठी ,सर्वस्व असे मराठी ….. आमुची मायबोली
२] मराठी – माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास ,
मराठी – माझी स्फूर्ती , माझे रक्त, मी मराठी , मायबोली मराठी
कार्यक्रम
मराठी भाषा गौरव दिन (अन्य नावे:मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.
कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे संकेतस्थळ .
मराठी पुस्तक प्रकाशक
मराठी भाषेमध्ये साहित्य प्रकाशित करणार्या काही प्रकाशनांची यादी खाली देत आहे.
मराठी पुस्तके हवी असणार्यांनी संपर्क साधून हवी ती पुस्तके मागवता येतील असे वाटून हा खटाटोप करतो आहे.
राजहंस प्रकाशन
आंतरजाल दुवा- स्वतः:ची वेबसाईट नाही. (परदेशात विक्री कशी करणार ते परमेश्वराला ठाऊक!)
पुणे: १०२५, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजळ, पुणे ३०. फोनः २४४६५०६३/२४४७३४५९
नाशिकः पंकज क्षेमकल्याणी: ९४२२२५२२०८ (पंकज यांना डिमांड ड्राफ्ट पाठवल्यास हे पोस्टाने परदेशातही पुस्तके पाठवण्याची सोय करतात.)
मॅजेस्टिक प्रकाशन
आंतरजाल दुवा- http://majesticprakashan.com/ मात्र सर्वसाधारणपणे नावाशिवाय काहीही दिसत नाही! (पविककतेपठा!)
ठाणे: न्यु इंग्लिश स्कूल समोर, राम मारूती रोड ठाणे ४००६०२ फोनः२५३७६८६५
दिग्दर्शक ओम राऊतच्या ‘तानाजी’चा फर्स्ट लूक…
दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपला नवीन सिनेमा घेऊन येतोय. यावेळी तो बॉलिवूडच्या ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ नावाचा चित्रपट घेऊन आलाय. याआधी ओमचा मराठी सिनेमा ‘लोकमान्य’ प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
ग्रंथ तुमच्या दारी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांचा पहिला आंतरराष्ट्रीय वाचक मेळावा
ग्रंथ तुमच्या दारी, दुबई आणि आमी परिवार (Akhil Amirati Marathi Indians) यांच्या संयुक्त विद्यमाने शारजा युनिव्हर्सिटी सभागृहात पहिल्या आंतरराष्ट्रीय वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त व उद्योजक श्री विश्वास ठाकुर,
दुबईत ग्रंथ तुमच्या दारीला सुरुवात करून देणारे व प्रसिद्ध उद्योजक डाॅक्टर संदिप कडवे, आमी परिवाराचे संस्थापक संतोष कारंडे, आमीचे मुख्य कार्यकारी आधिकारी नितीन साडेकर, प्रसिद्ध अनुवादक आणि लेखक श्री रवींद्र गुर्जर उपस्थित होते.
संगीत क्षेत्रातील सुवर्ण करीयर
ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की, तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला तसेच मेंदूला आनंद प्रदान करीत असते. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्यांला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे.
भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान आहे. ती आजही कायम असून संगीताला बकुळीच्या फुलाप्रमाणे जपण्यात आले आहे. तानसेनपासून तर गानकोकिळा लता मंगेशकर त्यांच्या कलाविष्काराने ते अधिक समृध्द झाले आहे. भारतीय संगीत गायन, वादन व नृत्य यांचा संगम आहे. भारतीय संगीत राग व ताल यांच्यावर आधारित आहे. त्यात लय व माधुर्याचा रंग भरण्याचे काम गायक करत असतात.
प्रतिभा, अभिरुचि व परिश्रम घेणार्या उमेदवारांना संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. काही व्यक्तींना मिळालेला सुमधुर आवाज तर परमेश्वराकडून मिळालेली देणगीच असते. मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे ही करियरची पहिली पायरी आहे.
आपल्यासाठी संगीतात करियर करणे काही कठीण नाही, असा आत्मविश्वास या क्षेत्रात पाऊल ठेवणार्या उमेदवाराला असला पाहिजे. यासोबत या क्षेत्रातील लोकांशी संपर्क, प्रशिक्षण तसेच व्यावसायिक रूपात लोकप्रिय होण्यासाठी आपली डेमो सीडी तयार करण्यासाठी आपल्याकडे भांडवल ही असणे गरजेचे आहे. विविध प्रकारात संगीताचे विभाजन करण्यात आले आहे. त्यात शास्त्रीय संगीत, लोक संगीत, जॉझ, पॉप, फ्यूजन अशा विविध शाखा आहेत. त्याच पध्दतीने या विविध शाखांमध्ये स्वतंत्र करीयर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
गायक किंवा वादक होण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कम्पोजर, प्रशिक्षक, गीतकार, म्युझिक पब्लिशर, म्युझिक जर्नालिस्ट, डिस्क जॉकी, म्युझिक थेरेपिस्ट, आर्टिस्ट तसेच संगीत कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी असे करीयरचे विविध पर्याय उपलब्ध असतात. म्युझिक चॅनल्सची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता व कार्यक्रमांना कार्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व, यामुळे संगीत क्षेत्रात करीयर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे.
शैक्षणिक पात्रता-
संगीत क्षेत्रात करियर करत असताना कुठली विशेष शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नसते. तरी देखील कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी दहावी (10+2) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संगीत क्षेत्रात सर्टिफिकेट कोर्स, बॅचलर डिग्री, डिप्लोमा कोर्स तसेच पोस्ट ग्रेजुएट कोर्स उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्सचा कालवधी एक वर्ष, बॅचलर डिग्रीचा तीन वर्ष तर डिप्लोमा व पोस्ट ग्रेजुएट कोर्सचा दोन वर्षे आहे.
संगीत विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण विविध संस्थामधून दिले जाते. भारतात मद्रास येथील कलाक्षेत्र व दिल्ली येथील भारतीय कला केंद्र, या संस्था संगीत क्षेत्रातील नामांकित संस्था आहेत.
महाराष्ट्राचा नकाशा
आमच्या विषयी
i मराठी.com : एक वेब पोर्टल “मराठी भाषेसाठी समर्पित ”
१] मराठी नवोदित कलाकार,लेखक,कवी यांची ओळख :- मराठी नवोदित सिने-नाट्य कलाकारांचे, लेखकांचे,प्रकाशकांचे, संगीत वादकांचे,वेबपेजेस तयार करून देणे व त्यांना संपर्क करण्याचा प्लॅटफॉर्म तयार करणे. .
२] मराठी प्रांतवार भाषा व माहिती :- महाराष्ट्रामध्ये दर १०० कि.मी ने भाषा बदलत जाते. तर त्याचे स्वरूप व त्या प्रांतातले काही नामवंत व्यक्ती, प्रांतवार मराठी उद्योजक, चित्रपट निर्माते,कलाकार व त्यांनी मराठी करता केलेले योगदान.
३] मराठी ऑडिओ बुक्स.छापील पुस्तके व त्याची विक्री. इ पुस्तके त्यांची निर्मिती व विकणे
४] पर्यावरण विषयक प्रकल्प:- आमच्या साईट वर आलेले मित्र व त्यांच्या सूचनांचा विचार करणे व पर्यावरण जपण्या करिता हातभार लावणे.
५] मराठी व एक दुसरे राज्य – मराठी व पंजाबी यावर भर देणे . [ संत नामदेव अभियान]
६] मराठी गाण्यांचे युट्युब :- मराठी थेट प्रक्षेपण: मराठी गाणी ,मराठी संगीत , नृत्य आणि ते i -मराठी.कॉम वेबसाईट वर टाकणे युट्युब सारखी कल्पना .
७] मराठी करता सर्व काही …………..
**************
जयंत शिरवाडकर,
संपर्क :- imarathim@ gmail.com
Mobile: ९७६३६४०३६५
आमचा पत्ता : imarathi.com
Blueplanet infosolutions P Ltd,
55, Anmol Building,Prashant Society, Behind Krishna Hospital,Paud Road, Pune.phone :- ०२०-२५४३४६२२ / २५४३४६४२ Ext. 201
आगामी कार्यक्रम

राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे, मुंबई
एखाद्या गंभीर आजारावरचा सिनेमा वा चित्रपट अथवा एखादी लेखनकृती हास्यस्फोटक, आनंददायी वगैरे असू शकते? अर्थातच.. नाहीच. यावर कुणी वादासाठी ‘आनंद’ सिनेमाकडे नक्की निर्देश करील. त्यात राजेश खन्ना कसा हसत हसत आपल्या दुर्धर आजारास सामोरा गेला, वगैरे सांगेल. ते खरं असलं तरी या सिनेमाला वेदनेची एक किनार सतत पाश्र्वभूमीला होतीच. हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो एक दिखावा होता. इतरांना आपल्या वेदना जाणवू नयेत, म्हणून. दुर्धर आजाराला काही माणसं मोठय़ा हिमतीनं सामोरी जातही असली, आणि त्याही स्थितीत कर्तृत्वाची नवी क्षितीजं काबीज करतही असली, तरी त्यांना आतून पक्की जाणीव असते, की हे सगळं लवकरच संपणार आहे. आपण काही दिवसांचेच सोबती आहोत. त्यांनी प्रकटपणे नाही दाखवली तरी मरणाची जाणीव त्यांना सतत साथ करत असतेच. ते ती व्यक्त करीत नाहीत, एवढंच.
मधुमेह हा आजार आज जगभरात प्रचंड प्रमाणावर वाढतो आहे. वरकरणी त्याचे दुष्परिणाम जाणवत नसले, तरी ते होतच असतात. मधुमेह हळूहळू माणसाला पोखरत जातो. आणि एके दिवशी तो असा काही हिसका दाखवतो, की तोपर्यंत (बऱ्याचदा) खूप उशीर झालेला असतो. मधुमेहाची वेळीच दखल घेऊन त्याला आटोक्यात ठेवणं म्हणूनच गरजेचं असतं. अनेकांना ही जाणीव आत्ता-आत्तापर्यंत नव्हती. परंतु आता मोठय़ा प्रमाणावर मधुमेहासंबंधी होत असलेल्या प्रचारामुळे त्याबद्दलची जागृती लोकांमध्ये वाढीस लागली आहे. हा आजार काहींच्या बाबतीत आनुवंशिक असतो, तसाच आधुनिक जीवनशैलीचाही तो एक परिपाक आहे. म्हणूनच त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. मधुमेही व्यक्तींना सजग करण्यासाठी आरोग्यविषयक प्रकाशनं, शासकीय व खासगी जाहिराती, वृत्तपत्रं-नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणारे लेख आपल्या परीनं धडपडत असले तरीही आपल्याकडे अजूनही एक मोठा वर्ग असा आहे, की जो मधुमेहाच्या दुष्परिणामांबद्दल अनभिज्ञ आहे. अशांना त्याच्या भयानकतेची जाणीव करून देण्यासाठी लेखक विद्यासागर अध्यापक यांनी ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक लिहिलं आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. ‘एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी’ असं त्याचं जे वर्णन केलं गेलं आहे, ते शंभर टक्के सत्य आहे.
साखर खाल्लेला माणूस
Prithvi Theatre, Mumbai Western Suburbs

We have often heard this – How am I going to train my cook?! Well, it’s easy, you can do it! However, if you need help, then leave it to us the experts. We will not only teach them how to cook, but also educate them on why it’s important to make these changes. This way not only would you empower them to cook healthy for you, but for themselves and their families too.
Menu
- No coffee cold coffee
- Veggie pizzas
- Batata vada and chutney
- Kosumbri
- Dal makhani
- Millet vegetable pulao
- Dahi vada
- Chocolate cake
Time: 2.30 pm to 5 pm.
Contribution: 1800 per person.
Early Bird Discount: 1500 per person till 8th Feb 2018.
Cancellation Policy: Cancellation before the early bird attracts full refund towards another program. Cancellation after early bird attracts 75% refund. No refund for cancellations on the day of the event.
RESOURCE PEOPLE


आम्ही आणि आमचे बाप
Pu. La. Deshpande and Acharya Atre have been household names in Marathi-speaking homes for a couple of generations now.Many of us have only come across Pu. La. and Atre as playwrights known for their
लेखक/कवी
हसून हसून पोट दुखेल बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला…आता आमच्या नवीनम्हणी ऐका…आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी